Saturday, 26 October 2019

KUSUMAGRAJ MARATHI POEMS | KAVITA SANGRAH

 A collection of marathi poems written by famous marathi poet..

Kusumagraj – Vishnu Vaman Shirwadkar (विष्णू वामन शिरवाडकर): (Born: 27 February 1912, Died: 10 March 1999) The famous Marathi poet in Indian literature. His play ‘Natsamrat’ has major role in Marathi literature. He was born in Pune, Maharashtra.

KUSUMAGRAJ KAVITA SANGRAH

1.Tujhya Yashacha Punav 
तुझ्या यशाचा हा पुनवचांद
अमृत देई आर्त जिवाला॥

प्रियजनांच्या सुखि रे आता
उरला मला विसावा
करिति आसवे हीच सुखाची
शीतल जीवन-ज्वाला॥

2.Hasara Nachara Jarasa Lajara 
हासरा नाचरा, जरासा लाजरा,
सुंदर साजिरा श्रावण आला

तांबुस कोमल पाऊल टाकीत
भिजल्या मातीत श्रावण आला
मेघांत लावीत सोनेरी निशाणे
आकाशवाटेने श्रावण आला

लपत, छपत, हिरव्या रानात,
केशर शिंपीत श्रावण आला
इंद्रधनुष्याच्या बांधित कमानी
संध्येच्या गगनी श्रावण आला

3.Natsamrat movie dialogues 

कुणी, घर देता का रे? घर?
एका तूफानाला कुणी घर देता का?
एक तूफान भिंती वाचून,
छपरा वाचून,
माणसाच्या माये वाचून,
देवाच्या दये वाचून,
डोंगरा डोंगरात हिंडत आहे.
जिथुन कुणी उठवनार नाही,
अशी जागा ढूंढत आहे,
कुणी, घर देता का रे? घर?

काय  रे बाळा, खरच सांगतो बाबांनो
तूफान आता थकून गेलय,
झाडा-झुडपात, डोंगर-दर्यात,
अर्ध-अधिक तुटून गेलय,
समुद्राच्या लाटांवरती,
वनव्याच्या जाळावरती,
झेप झुंज घेऊन घेऊन,
तूफान आता थकलय.
जळके तूटके पंख पालवित,
खुरडत खुरडत उडत आहे,
खर सांगतो बाबांनो,
तुफनाला तूफानपनच नडतय रे,
हे.. बाबा.. कुणी घर देता का रे? घर?

तुफनाला महाल नको,
राजवाड्याचा सेट नको,
पदवी नको, हार नको,
थैली मधली भेट नको,
एक हव लहान घर..
पंख मिटु पडण्यासाठी,
एक हवी आराम खुर्ची..
तुफनाला बसण्यासाठी,
एक तुळशी वृंदावन हवय..
मागच्या अंगणात.. सरकारांसाठी.
कुणी घर देता का रे? घर?

4.Majhya Marathi Maticha 
माझ्या मराठी मातीचा,
लावा ललाटास टिळा,
हिच्या संगाने जागल्या,
दरयाखोर्यांतील शिळा.

हिच्या कुशीत जन्मले,
काळे कणखर हात,
ज्यांच्या दुर्दम धीराने,
केली मृत्यूवरी मात.

नाही पसरला कर,
कधी मागायास दान,
स्वर्णसिंहासनापुढे,
कधी लवली ना मान.

5.Swapna Nagarchya Sundar 
स्वप्‍ननगरच्या सुंदर माझ्या
राजस राजकुमारा
अपार माझ्या काळोखाला
दिलास जीवनतारा

सुंदर आता झाली धरती
सुंदर नभ हे वरती
वैराणावर उधळीत आला
श्रावण सुंदर मोती
मनात माझ्या मोरपीसांचा
फुलला रंग पिसारा

6.He surano, chandra vha
हे सुरांनो, चंद्र व्हा
चांदण्याचे कोष माझ्या
प्रियकराला पोचवा ॥

वाट एकाकी तमाची
हरवलेल्या मानसाची
बरसुनी आकाश सारे
अमृताने नाहवा ॥

7.Majhya Matiche Gayan
माझ्या मातीचे गायन
तुझ्या आकाश श्रुतींनी
जरा कानोसा देऊन
कधी ऐकशील का रे?

माझी धुळीतील चित्रे
तुझ्या प्रकाश नेत्रांनी
जरा पापणी खोलून
कधी पाहशील का रे?

माझ्या जहाजाचे पंख
मध्यरात्रीत माखले
तुझ्या किनाऱ्यास दिवा
कधी लावशील का रे?

8.Pachola
आडवाटेला दूर एक माळ

तरू त्यावरती एकला विशाळ
आणि त्याच्या बिलगूनिया पदास
जीर्ण पाचोळा पडे तो उदास
उषा येवो शिंपीत जीवनासी
निशा काळोखी दडवु द्या जगासी
सूर्य गगनातुनि ओतु द्या निखारा
मूक सारे हे साहतो बिचारा
तरूवरची हसतात त्यास पाने
हसे मुठभर ते गवतही मजेने
वाटसरु वा तुडवीत त्यास जात
परि पाचोळा दिसे नित्य शांत
आणि अंती दिन एक त्या वनांत
येइ धावत चौफेर क्षुब्ध वात
दिसे पाचोळा घेरुनी तयाते
नेइ उडवुनि त्या दूर दूर कोठे
आणि जागा हो मोकळी तळाशी
पुन्हा पडण्या वरतून पर्णराशी

9.Utha utha Chiutai
उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजुनही, अजुनही

सोनेरी हे दुत आले
घरटयाच्या दारापाशी
डोळयांवर झोप कशी
अजुनही, अजनुही?

लगबग पांखरे ही
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहींकडे, चोहींकडे,

10.Haa Chandra
या चंद्राचे त्या चंद्राशी मुळीच नाही काही नाते
त्या चंद्रावर अंतरिक्ष-यानात बसूनी माकड,मानव, कूत्री यांना जाता येते

या चंद्राला वाटच नाही, एक नेमके ठिकाण नाही
हा ही नभाचा मानकरी पण लक्ष मनांच्या इंद्रगुहांतून भटकत राही

नटखट मोठा ढोंगी सोंगी, लिंबोणीच्या झाडामागे कधी लपतो मुलाप्रमाणे
पीन स्तनांच्या दरेत केव्हा चुरुन जातो फुलाप्रमणे

भग्न मंदीरावरी केधवा बृहस्पतिसम करतो चिंतन
कधी बावळा तळ्यात बुडतो थरथर कापत बघतो आतून

तट घुमटावर केव्हा चढतो, कधी विदुषक पाणवठ्यावर घसरुन पडतो
कुठे घराच्या कौलारावरुनी उतरुन खाली शेजेवरती
तिथे कुणाची कमल पापणी हळूच उघडून नयनी शिरतो
कुठे कुणाच्या मूक्त मनस्वी प्रतिभेसाठी द्वारपाल होऊनी जगाच्या रहस्यतेचे दार उघडतो

अशा बिलंदर अनंतफंदी या चंद्राचे त्या चन्द्राशी कुठले नाते?
त्या चन्द्रावर अंतरिक्ष-यानात बसूनी शास्त्रज्ञांना जाता येते
रसीक मनांना या चंद्राला पळ्भर केव्हा डोळ्यात वा जळात केवळ धरता येते.

11. Kana 
ओळखलत का सर् मला पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले केसावरति पाणी

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहुन
गंगामाई पाहुणि आलि गेली घरटयात राहुन

माहेरवाशिण पोरिसारखी चार भिंतित नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी बायको माञ वाचली

12.Prem
पुरे झाले चंद्रसूर्य
पुऱ्या झाल्या तारा
पुरे झाले नदीनाले
पुरे झाला वारा
मोरासारखा छाती काढून उभा रहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा
सांग तिला तुझ्या मिठीत
स्वर्ग आहे सारा

शेवाळलेले शब्द आणिक
यमकछंद करतील काय?
डांबरी सडकेवर श्रावण
इंद्रधनू बांधील काय?

उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत रहाशील फिरत
जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगिनचिठ्ठी
आल्याशिवाय राहील काय?

म्हणून म्हणतो जागा हो
जाण्यापूर्वी वेळ
प्रेम नाही अक्षरांच्या
भातुकलीचा खेळ

प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत रहाणं

प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवूनसुद्धा
मेघापर्यंत पोचलेलं

शव्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस
बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस

उधळून दे तुफान सगळं
काळजामध्ये साचलेलं
प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं 
x